
अमरावती : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील हरभरा व पानपिंपळीस भारत सरकारचे भैागोलिक मानांकन मिळाले आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर अमरावती जिल्ह्याचा बहुमान वाढला आहे. यासोबतच हरभरा व पिंपळीला विस्तारित बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. अंजनगवासुर्जी येथील कार्ड (कम्युनिटी अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट सोसायटी) या संस्थेच्या नावावर याची नोंदणी झाली आहे.