

चांदूर : चुकीने मध्यरात्री दीड वाजताचा लागलेला अलार्म वाजला. आवाजामुळे झोपेतून उठलेल्या जावयाला घराची भिंत पडत असल्याचे दिसले. त्यांनी घरातील सर्वांना तातडीने बाहेर काढले. काही वेळातच ते झोपले असलेल्या घराची खोली पूर्णत: जमीनदोस्त झाली. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठा कडू या गावात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कवठा कडू येथील सारंगधर श्यामराव लांजेवार यांचे दोन खोल्यांचे टीन-मातीचे घर आहे. त्यांची २५ वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्यांच्या मुलीसह गावाला आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपी गेले. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराच्या भिंतीने ओल पकडली होती. मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान लांजेवार यांच्या जावयाचा मोबाईलचा अलार्म वाजला. मात्र, तो अलार्म चुकीने लागला होता. अलार्मच्या आवाजामुळे जावयाची झोप उघडली.
अलार्म बंद केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की घराची भिंत खचत आहे. त्यांनी लगेच कुटुंबातील सर्व सदस्यांना झोपेतून उठवले. सर्वांना घराबाहेर काढले. यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटांतच ते ज्या खोलीत झोपले होते ती खोली पूर्णतः जमीनदोस्त झाली. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित नी झाली नाही. मात्र, सारंगधर लांजेवार यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले. चुकीने लागून वाजलेल्या अलार्ममुळे सदर कुटुंब बालबाल बचावले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठ्यांनी बुधवारी (ता. १४) पंचनामा केला आहे. शासनाने तत्काळ दखल देऊन उघड्यावर आलेल्या कुटुंबाला मदत द्यावी, अशी मागणी सारंगधर लांजेवार यांनी केली आहे.
यादीत नाव, मात्र घरकुल मिळाले नाही
नुकसानग्रस्त सारंगधर लांजेवार यांचे घरकुल यादीत नाव समाविष्ट आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरकुलाचा लाभ तत्काळ देण्याची मागणी लांजेवार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.