Amravati : सरपंच, पॉलिटिकल आयकॉन्सच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित; कौटुंबिक वातावरणात रंगला सोहळा
Sakal Idol Maharashtra
Sakal Idol Maharashtra esakal

अमरावती : घरातील कर्तव्ये पार पाडत असतानाच गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या महिला सरपंच, लोकप्रतिनिधींसह लोकसेवकांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारा दिमाखदार सोहळा बुधवारी (ता. १२) अमरावतीत पार पडला. अनेकांनी कुटुंबीयांसह या सोहळ्याला हजेरी लावल्याने या गौरवसोहळ्याचे रूपांतर कौटुंबिक सोहळ्यात झाले होते.

अमरावतीच्या हॉटेल गौरी इनमध्ये बुधवारी आयोजित ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ या देखण्या कार्यक्रमाची अमरावती नगरीवर अमिट छाप उमटली. राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, ज्येष्ठ उद्योजक अरुण वरणगावकर, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, सहायक महाव्यवस्थापक (जाहिरात) सुधीर तापस आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी ‘सकाळ’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

रंगीबेरंगी दिव्यांच्या झोतातून हळूवार होणारी प्रकाशाची पेरणी, व्यासपीठाची भव्यदिव्य सजावट अशा प्रसन्न तसेच मनाला उल्हासित करणाऱ्या वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व सत्कारमूर्तींचे टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुषमा कोठीकर यांनी केले. आभार जाहिरात व्यवस्थापक धनंजय कानबाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हॉटेल गौरी इन, छायाचित्रांसाठी उदय चाकोते, तांत्रिक व ध्वनी व्यवस्थेसाठी गोपी यांचे सहकार्य लाभले.

अनेकांनी व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव

पदावर असताना नेहमीच लोकांच्या समस्या एकाव्या लागतात. अनेकजण तर केवळ टीका करतात. टीकेची झोड सहन करूनसुद्धा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत गावाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्यांचा गौरव सोहळा कुटुंबातील सदस्यांसोबत पार पडला. विशेष म्हणजे आमच्या कामाची दखल आजवर कुणी घेतली नाही, मात्र सकाळने पाठीवर कौतुकाची थाप मारून आम्हाला पुढील कामासाठी प्रेरित केले, अशी भावना अनेक सत्कारमूर्तींनी यावेळी व्यक्त केली. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com