

Amravati
esakal
अमरावती: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून बंदी आणि कर्मचाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आता बाहेर यायला लागले आहेत. एका कारागृह शिपायाच्या स्मार्ट फोनमध्ये बंदीचे नाव, त्याने लिहिलेल्या स्वाक्षरीचे पत्र आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाच्या वतीने कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या माध्यमातून येथील शिपाई योगेश हरिनारायण जानोकर (वय ३८) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार केली आहे. त्या आधारे येथे कार्यरत शिपाई संशयित उदय अशोकराव झपाटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.