Amravati Lok Sabha Result: ...तर नवनीत राणा जिंकल्या असत्या; बच्चू कडू यांनी लगावला टोला

Navneet Kaur Rana lost: नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रयत्न केले होते. आता राणा यांच्या पराभवानंतर कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
bacchu kadu  Navneet Kaur Rana
bacchu kadu Navneet Kaur Rana

Amravati Lok Sabha Result- अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. नवनीत राणा यांचा पराभव व्हावा यासाठी प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रयत्न केले होते. आता राणा यांच्या पराभवानंतर कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवी राणा गप्प राहिले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, 'अर्ज भरायला जात असताना सोयीचा निकाल लागला, अगदी जसा पाहिजे तसा निकाल देण्यात आला. लोकांना हे आवडलं नाही. आमचं मैदान असताना त्यांनी ते घेतलं. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, निवडणुकीचे मैदान आम्ही जिंकू. एकंदरीत. या सर्व घटनांमुळे नवनीत राणा न्यायालयात जिंकल्या पण, जनतेच्या कोर्टात त्या हरल्या आहेत.'

bacchu kadu  Navneet Kaur Rana
Amravati Lok Sabha Election Result : नवनीत राणांची प्रतिष्ठा पणाला

काही जण आपापलं कर्तृत्व निर्माण करत असतात. रवी राणा जरी गप्प राहिले असते तरी कदाचित नवनीत राणा जिंकल्या असत्या असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

bacchu kadu  Navneet Kaur Rana
Loksabha Election Result 2024 : महाविकास आघाडीची मुसंडी! पंकजा मुंडे पराभूत; नगरमध्ये नीलेश लंके ‘जाएंट किलर’

राज्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याठिकाणी भाजपच्या नवनीत राणा यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार बलवंत वानखेडे यांचे आव्हान होते. वानखेडे यांनी १९७३१ मतं अधिक घेऊन राणा यांचा पराभव केला आहे. राणा या २०१९ मध्ये अपक्ष म्हणून खासदार झाल्या होत्या. पण, २०२४ मध्ये भाजपची ताकद पाठीशी असून देखील राणा यांना धक्कादायकरीत्या पराभव सहन करावा लागला आहे.

काँग्रेसकडून लढताना वानखेडे यांना ५२६२७१ मत मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना ५०६५४० जागा मिळाल्या. दरम्यान, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना हरवण्यासाठी एक उमेदवार उभा केला होता. या उमेदवाराने ७९४४५ घेतली. त्यामुळे देखील राणा यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. कडू यांनी राणा यांचा पराभव करणारच असा निर्धार केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com