

Amravati News
sakal
अमरावती : अमरावती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंधरा महिन्यांमध्ये केवळ ७७५ ग्रॅम एमडी जप्त केले होते. परंतु रविवारी (ता. ८) पहिल्यांदा गुन्हे शाखेने तीन कोटी एक लाख २० हजार रुपयांचे दोन किलो ८० ग्रॅम एमडी जप्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.