
Amravati : दोन दिवसापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे; अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार
विवरा, ता. पातूर : प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे डांबरीकरण गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जेचे होत असल्याने सुकळी ते सुकळी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे डांबरीकरण गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सुकळी ते सुकळी रस्त्याचे काम सुकळी येथील ग्रामस्थांनी थांबवले आहे.
निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी खेट्री येथील सरपंच जहूर खान यांनी थेट अमरावतीच्या प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या अधीक्षक अभियंत्यांकडे धाव घेऊन गुरुवार, ता. ८ जून रोजी तक्रार दाखल केली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये किती मुरूम डांबर व इतर साहित्यांचा कमी प्रमाणात वापर केला जात असल्याने तीन दिवसापूर्वी केलेल्या डांबरीकरण रस्त्यावर खड्डे पडले आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेचे अधिकारी व कंत्राटदार यांची मिली भगत असल्याने रस्त्याचे डांबरीकरण थातूरमातूर करून देयक लाटण्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे उच्चस्तरीय समिती गठीत करून ग्रामस्थ समक्ष मोका पाहणी करून चौकशी करण्याची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांची ओरड सुरू आहे. मात्र, राजकीय पक्षाचे पदाधिकारी गप्प का आहे, असा संभ्रम ग्रामस्थांमध्ये निर्माण होत आहे. अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याने गावकऱ्यांना रस्त्याचे काम थांबून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- गणेश वांडे, भाजप कार्यकर्ता, सुकळी
सुकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या संबंधितांकडे वारंवार तोंडी तक्रार केल्यात; परंतु अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अधीक्षक अभियंता अमरावती यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
- जहुर खान, सरपंच, खेट्री
अधीक्षक अभियंता यांचा प्रभारी पदभार तात्पुरता माझ्याकडे आहे. तरीही प्राप्त झालेली तक्रार नियमित अधीक्षक अभियंता रुजू होताच त्यांच्याकडे देण्यात येईल.
- एन. आर. देशमुख, कार्यकारी अभियंता, प्र. ग्रा.स.यो. अमरावती