अमरावती : अवयवदानाच्या मोहिमेला हेलिपॅडचा खोळंबा

अमरावती जिल्ह्यात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळाली.
helipad
helipadSakal

परतवाडा (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळाली. अमरावती शहरातून अवयव अन्य ठिकाणी नेण्यासाठी थोड्याफार सोयी आहेत. मात्र, अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात ही चळवळ गतिमान झाली असली तरी हेलिपॅडसारख्या यंत्रणेअभावी खोळंबा होतो. त्यामुळे इच्छा असूनही संबंधित व्यक्तीच्या अवयवांच्या दानात अडथळा येतो. त्यासाठी शासन-प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे आहे.

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाबाबतची जनजागृती होत आहे. आता नागरिकही स्वतःहून त्यासाठी पुढे येत आहेत. मात्र हेलिपॅड नसल्याने मानवाचे हृदय व फुप्फुस दान करण्यासाठी अडचणी निर्माण होताहेत. शहरात भंसाली हॉस्पिटल येथे ऑर्गन हार्वेस्टिंग सेंटर मागील २०१८ पासून सुरू झाले असून, तेथे आतापर्यंत चार व्यक्तींवर अवयवदानाची प्रक्रिया पार पडली.

helipad
अभियांत्रिकी प्रवेशासाठी हवेत ९० पेक्षा जास्त पर्सेंटाईल

असे असले तरी दुसरीकडे मानवी हृदय व फुप्फुसाचे चार तासांच्या आत प्रत्यारोपण गरजेचे असल्याने एअर अ‍ॅम्बुलन्ससारखी अतिजलद व्यवस्था वैद्यकीय क्षेत्रात असणे गरजेचे आहे. मात्र, ही व्यवस्था उभी न झाल्याने आधी वेदांत त्यानंतर आता विशाल यांचे हृदय व फुप्फुसाचे दान होऊ शकले नाही. या दोघांचे दान झाले असते तर आणखी चार लोकांना जीवनदान मिळाले असते. लोकप्रतिनिधींसह शासन-प्रशासनाने लवकरात लवकर हेलिपॅड व तत्सम यंत्रणेकरिता प्रयत्न करावे, अशी माफक अपेक्षा विविध संघटना तथा नागरिकांनी व्यक्त केली.

अचलपुरात मोठ्या प्रमाणात दवाखाने आहेत. वैद्यकीय अथवा इतर अत्यावश्यक सेवेसाठी हेलिपॅड गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हेलिपॅड बनवण्याकरिता मागणी करणार आहे.

- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट

हेलिपॅड बनवणे गरजेचे आहे. त्यासोबत पर्यायी सुविधाही शासनस्तरावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. जेणेकरून अवयवदानासोबतच इतर वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे.

- केवलराम काळे, माजी आमदार, मेळघाट

helipad
आरोग्य विभाग परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

हेलिपॅड गरजेचेच आहे. याकरिता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून हेलिपॅड करण्यासंदर्भात विनंती करणार आहे.

- बळवंत वानखडे, आमदार, दर्यापूर

अवयवदानासाठी नागरिक पुढे येत आहेत. तसेच अचलपूर जिल्हा प्रस्तावित आहे. याकरिता हेलिपॅड गरजेचे आहे. वैद्यकीय सोबतच इतरही अत्यावश्यक सेवेसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो.

- डॉ. हर्षराज डफडे, पदाधिकारी पुनर्जीवन फाउंडेशन

अवयवदानाबाबत जागृती झाली असून, यासाठी नागरिक पुढे येत आहेत. अवयव सर्वांत मोठे दान असल्याने शासनानेही एक पाऊल पुढे टाकून जुळ्या शहरात शासकीय हेलिपॅड द्यावे. जेणेकरून कुणाचा तरी जीव वाचवता येईल.

- गजानन कोल्हे, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल, भाजप

जुळ्या शहरात हेलिपॅड असणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात नगरपरिषदेच्या येणाऱ्या सभेत ठराव घेऊन शासनाकडे पाठविण्यात येईल व त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.

- सुनीता फिसके, नगराध्यक्ष, अचलपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com