Amravati News: सरावादरम्यान धावताना विद्यार्थ्याला ब्रेनस्ट्रोक; व्हीएमव्ही परिसरातील घटना, पोलिस भरतीचा करीत होता सराव
Amravati Police Bharti: अमरावतीत पोलिस भरतीच्या १६०० मीटर धावण्याच्या सरावादरम्यान १९ वर्षीय विकास मावस्कर यांचा ब्रेनस्ट्रोकने मृत्यू झाला. मुंबई येथे होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी जाण्याच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे वसतिगृह आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमरावती : पोलिस दलात भरती प्रक्रियेसाठी १६०० मीटर धावण्याचा सराव करताना अचानक मैदानावर कोसळलेल्या आदिवासी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.२८) सकाळी मृत्यू झाला.