

Amravati Prostitution Case
esakal
अमरावती: शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत टीसीनगर परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू होता. देहविक्री सुरू असलेल्या फ्लॅटवर भरोसा सेलच्या पथकाने सोमवारी (ता. १०) सायंकाळी छापा टाकला. पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जागा उपलब्ध करून देणारी महिला, दोन पुरुष ग्राहक आणि दोन महिला, अशा एकूण पाच जणांना अटक करून त्यांची राजापेठ ठाण्यात चौकशी सुरू करण्यात आली आहे.