राज्यातील 'या' जिल्ह्यात दुसऱ्यांदा वाढलीय कोरोना रुग्णसंख्या, ग्रामीण भागात सुमारे ८० टक्के रुग्ण

Corona
CoronaMedia Gallery

अमरावती : राज्यातील कोरोना रुग्णांची (coronavirus cases in amravati) संख्या घटत असताना अमरावतीमध्ये मात्र रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमरावतीमध्ये (amravati) दुसऱ्यांदा ही रुग्णवाढ (surge in corona cases) पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात पहिल्यांदा अमरावतीमध्ये रुग्णवाढ पाहायला मिळाली होती. त्यानंतर १० दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात आला. त्यानंतर अमरावतीमधील कोरोना ग्राफ कमी झाला. मात्र, आता राज्यभरात लॉकडाउन असून सुद्धा अमरावतीमधील कोरोना रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळते. (amravati sees another surge in corona case)

Corona
नशा करणाऱ्या तरुणांनो सावधान! नागपुरात ‘ड्रग्स फ्री सीटी’ संकल्पना

राज्यात १६ एप्रिलपासून लॉकडाउन घोषित करण्यात आला. संपूर्ण राज्यात लॉकडाउन असताना अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये प्रचंड रुग्णसंख्या वाढत असल्याची चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली. याउलट नागपुरातील रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही वाढ होऊ शकते. त्यासाठी आरोग्य विभाग ट्रेसिंग करून डेटाचा अभ्यास करत आहे. त्यानंतर काही चाचणी नमुने हे जीनोम सिक्विेंसिगसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

तारीख कोरोना रुग्णसंख्या मृत्यू

१४ मे 922 20

१५ मे 1097 21

१६ मे 1175 18

१७ मे 870 20

१८ मे 798 21

Corona
नागपुरात म्युकर मायकोसिसमुळे १० जणांचे काढले जबडे, ९ रुग्ण ठणठणीत बरे

गेल्या एक आठवड्यापासून यवतमाळ व बुलडाणा येथेही एप्रिलच्या शेवटी आणि मेच्या सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. काही जिल्ह्यांत वाढ का नोंदविली गेली आणि काहींमध्ये अचानक घसरण का दिसून येते याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यात सोमवारी जिल्ह्यांसह व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. नांदेडमध्ये ८१ टक्के, तर मुंबईमध्ये ७७ टक्क्यांनी रुग्णसंख्येत घट होत असल्याचे या बैठकीतून समोर आले.

शहरातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे अमराती ग्रामीणमध्ये ८३ टक्क्यांनी नवीन रुग्ण वाढताना दिसत आहेत. तरुणांच्या मृताचा आकडा वाढत असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले. आतापर्यंत जवळपास १२७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १६८ हे ४१ ते ५० या वयोगटातील आहेत, तर ९५ हे ३१ते ४० या वयोगटातील आहे. ६९७ मृत्यूचे डेथ ऑडीट करण्यात आल्याचे जिल्ह्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. वास्तविक पाहता ग्रामीण भागात लोकसंख्या कमी असल्यामुळे कोरोनाला लवकर आळा घालता येऊ शकतो. मात्र, अमरावतीमध्ये याउलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नेमका कोणता पॅटर्न आहे हे आतापर्यंत समजू शकत नाहीये. मात्र, याठिकाणी कोरोनाचा नवे स्ट्रेन असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. अमरावतीमधून नियमित १८० नमुने हे जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात येतात. यामध्ये डबल म्युंटट आढळून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com