Amravati Firing Case: स्वतःच्याच घरावर फायरिंगसाठी सुपारी; चौघांना अटक : विपुल ठाकरे पसार; दोन खाली काडतुसे सापडली : रविवारच्या रात्रीची घटना

Self-Firing Conspiracy Uncovered in Amravati: गुन्हे शाखेने कटात सहभागी चौघांना अटक केली असून, घरमालक विपुल ठाकरे पसार आहे. तपासात १०० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
Amravati Firing Case

Amravati Firing Case

esakal

Updated on

अमरावती: अमरावती शहरातील अर्जुननगर जिजाऊ कॉलनी परिसरात स्वतःच्याच घरावर फायरिंग करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. अचानक एकाच्या घरावर गोळीबार केल्याने पोलिस यंत्रणा ही खळबळून जागी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी सहा स्वतंत्र तपास पथकाचे गठन केले. त्यापैकी गुन्हे शाखेच्या तपास पथकाने कटात सहभागी चौघांना सोमवारी (ता.१०) अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com