अमरावती: वाद मिटला! शिवरायांच्या पुतळ्याला मिळाली मंजूरी

अमरावती: वाद मिटला! शिवरायांच्या पुतळ्याला मिळाली मंजूरी

अमरावती : अमरावतीमधील राजापेठ उड्डाण पुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अनधिकृत पद्धतीने हा पुतळा उभारण्यात आल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने हा पुतळा हटवला होता. त्यानंतर, आयुक्तांवर शाईफेक देखील करण्यात आली होती. मात्र, आता हा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुतळा उभारण्याला महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. बसपा नगरसेवक चेतन पवार यांनी या संदर्भात प्रस्ताव मांडला होता.

अपक्ष आमदार रवी राणा यांनी उभारलेला पुतळा महानगरपालिकेने हटवला होता. यावरुन मोठा वाद झाला होता. पुतळा हटवण्याची कारवाई केल्याबद्दल मनपा आयुक्तांवर शाईफेक देखील करण्यात आली होती.

राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या प्रस्तावास आज महापालिकेच्या आमसभेने मंजुरी प्रदान केली. यासोबतच छत्रीतलाव येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली. दोन्ही पुतळे महापालिकेच्या वतीने बसविण्यात यावेत व त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असाही निर्णय आमसभेत करण्यात आला.

पक्षनेते तुषार भारतीय यांनी छत्रीतलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पटलावर मांडला. त्यावर सांगोपांग चर्चा झाली. पुतळा बसविण्याचे सर्व नियम तपासून व परवानगी मिळवत पुतळा स्थापन करावा, असे मत मांडण्यात आले. महापौरांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.

बसपचे गटनेते चेतन पवार व भाजपचे सदस्य सुनील काळे यांनी ऐनवेळचा विषय म्हणून राजापेठ उड्डाणपूल चौकात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. याविषयावर चर्चा करताना मिलिंद चिमोटे यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरव्दारे पुतळा बसवणार कोण, हे स्पष्ट करण्याची मागणी केली. ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी सभागृहास उशिराने सुचलेले शहाणपण, अशा शब्दात मांडणी करीत यासाठी तातडीची सभा घेऊन विशेष आमसभा आयोजित करायची होती व प्रस्ताव मांडायचा होता, असे मत मांडले. ते म्हणाले त्यावेळी नियमानुसार पुतळा बसवला असता तर आमदारांचे अभिनंदन केले असते. आता मनपाने नियम तपासून प्रस्ताव मंजूर करावा. त्यांनी आयुक्तांसोबत घडलेल्या शाईफेक प्रकरणाचाही उल्लेख करीत हा सभागृह व अमरावतीकरांचा अपमान असल्याचे म्हटले. शहरात सभागृह पुतळ्याच्या विरोधात आहे, असे वातावरण निर्माण झाल्याने त्याची जबाबदारी महापौरांनी इच्छा नसतानाही स्वीकारावी, असे मत व्यक्त केले.

या चेर्चेत गंगा अंभोरे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे स्मरण करून दिले. चर्चेनंतर पीठासीन सभापती महापौर चेतन गावंडे यांनी नियमानुसार पुतळा उभारता येत असल्यास महापालिकेच्या वतीने उभारावा व छत्रीतलाव तसेच राजापेठ येथील पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी, असा निर्णय दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com