अमरावती : पिंपळखुटा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळखुटा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

अमरावती : पिंपळखुटा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

धामणगाव रेल्वे: सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील पिंपळखुटा येथील एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.मृतक शेतकऱ्याचे नाव योगेश संजयराव ठाकरे ( २६ )असे असून योगेश आपल्या आईला घेऊन पिंपळखुटा येथे राहात होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून योगेश ठाकरे हा आई संध्या संजय ठाकरे यांच्यासह पिंपळखुटा येथे राहत होता.दोघांच्याही नावे पिंपळखुटा शेतशिवारात सर्वे क्रमांक ११७(१)अ वर एकूण ४ एकर शेतजमिनी आहे.आईचा सांभाळ करून योगेश शेती करीत होता.मागील २ वर्षात त्याला नापिकी झाली.हलाखीच्या परिस्थितीत काडीमोड करून उभारलेली शेती पिकत नसल्याने योगेशच्या डोक्यावर बँकेचे व खाजगी कर्ज झाले होते व त्यामुळे तो नेहमीच चिंताग्रस्त असायचा.दरम्यान १८ एप्रिल २०२२ सोमवार रोजी दुपारच्यावेळी शेतात व्हीफास मारायला जातो,असे सांगून गेलेला योगेश रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही.काळजीत असलेल्या आईने कुटुंबातील शेजारी योगेशच्या चुलतभाऊ स्वप्नील ठाकरे याला योगेशचा शोध घेण्यास पाठवले.मात्र तो मिळून आला नाही.

दरम्यान दुसऱ्या रोजी १९ एप्रिल मंगळवारपर्यंत शोध घेतला असता सकाळी ८ चे सुमारास परिसरातील रुखमाबाई ढाणके यांच्या शेतातील विहिरीत योगेशच्या पायातील चप्पला विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसल्या.घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली व गावकऱ्यांनी गळ लावून शोध घेतला असता योगेशचा मृतदेह विहिरी आढळून आला.मृतक योगेश ठाकरे याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्याचा चुलतभाऊ स्वप्नील ठाकरे यांनी मंगरूळ पोलिसांना दिली आहे.नापिकीमुळे शेतमाल घरात आला नाही त्यामुळे योगेशच्या डोक्यावर स्टेट बँक अंजनसिंगी शाखेचे १ लाखाचे व खाजगितील घेतलेले कर्ज वाढतंच गेले व अखेर नैराश्यातून योगेश ठाकरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amravati Suicide Young Farmers Pimpalkhuta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top