Amravati: घरफोडी, चोरीमध्ये तीन लाख; ६७ हजारांचा ऐवज लंपास
Theft and Burglary Cases Reported in Amravati: अमरावतीत घरफोडी आणि चोरीच्या घटनांत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
अमरावती: ग्रामीण भागात वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. चिखलदरा आणि कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरी व घरफोडीत तीन लाख ६७ हजार ७०१ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.