

Amravati Accident
esakal
अमरावती: दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राजापेठच्या उड्डाणपुलावर घडली. गौरी प्रमोद धर्माळे (वय २७, रा. बोरगाव धर्माळे) व हर्षा आदेश गावंडे (वय ३८, रा. भटवाडी अमरावती), अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गौरी धर्माळे ही त्यांची मावशी हर्षा गावंडे यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती.