
अमरावती : अमरावतीच्या नांदगावपेठ एमआयडीसी येथील एका रेडिमेड कपडे तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कार्यरत टेलरला थेट पाकिस्तानमधून धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने देशात तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची बाब चौकशीतून पुढे आली.