Amravati : युवा शेतकऱ्याची आत्महत्या

हिमांशू चौधरी यांच्याकडे दोन एकर शेती आहे
File photo
File photosakal

धामणगावरेल्वे : तालुक्यातील जळगाव येथे युवा पदवीधर शेतकऱ्याने कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. दोन) सायंकाळच्या सुमारास घडली. हिमांशू ऊर्फ भूषण मनोज चौधरी (वय २२) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू चौधरी यांच्याकडे दोन एकर शेती आहे. यात त्यांनी कोबी या भाजीची व कपाशीची लागवड केली होती. परंतु सततच्या पावसामुळे कोबी व कपाशी पिकांचे नुकसान झाले. त्यात कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यामुळे हिमांशू नेहमी चिंतित राहायचा, असे मृताचा मोठा भाऊ अमर चौधरी यांनी सांगितले. बुधवारी (ता. दोन) घरी कुणी नसताना हिमांशूने गळफास लावला. गुरुवारी (ता. तीन) येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. हिमांशू याच्यावर जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com