Yavatmal News : पुरातन ‘निर्गुडा’चे सापडले अवशेष; प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनांना मोठे यश
Tribal Heritage : वणी शहराच्या उगमाचा ऐतिहासिक शोध लावताना प्रा. सुरेश चोपणे यांनी वणीच्या दक्षिणेला 'निर्गुडा' हे प्राचीन आदिवासी गाव शोधून काढले. या गावाच्या दोन्ही तीरांवर प्राचीन देवळांचे अवशेष सापडले असून वणीचा इतिहास नव्याने उलगडत आहे.
वणी (जि. यवतमाळ) : सातवाहन आणि वाकाटक या दोन हजार वर्षांपुर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे निर्गुडा नावाचे गाव होते. याच गावावरून नदीला निर्गुडा हे नाव पडले. परंतु पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वणी झाले होते.