Ancient Shiva Templesakal
विदर्भ
Ancient Shiva Temple : चांदूरबाजार तालुक्यात जमिनीच्या आत सापडले पुरातन शिवमंदिर
देऊरवाडा हे गाव पुरातन व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी पुरातन नृसिंह मंदिरदेखील आहे. सापडलेले पुरातन मंदिर भानूतीर्थ असल्याचे म्हटले जाते.
अमरावती (चांदूरबाजार) - चांदुरबाजार तालुक्यातील श्रीक्षेत्र देऊरवाडा येथे पूर्णा व मेघा नदीच्या संगमाजवळ पूर्णा नदीकाठी शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन शिवमंदिर जमिनीत आढळून आल्याची आश्चर्यकारक घटना आज घडली. हे पुरातन मंदिर भानूतीर्थ असल्याचे बोलल्या जात आहे.
