
नांदुरा : यावर्षीपासून राज्यातील अंगणवाड्यात आधारशीला एक, आधारशीला दोन व आधारशीला तीन हे नव्याने विकसित केलेले अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या २०२० च्या अंमलबजावणीचा हा भाग असणार आहे.