खारे पाणी गोड करणाऱ्या मशीनचा मोह आला अंगलट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अमरावती : मशीन लावल्यास खारे पाणी गोड करता येते, असे आमिष दाखवून भातकुली तालुक्‍यातील रामा येथील वृद्धाची 1 लाख 8 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. देवेंद्र नारायण जुनघरे (वय 60, रा. रामा) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

अक्षयकुमार गवई (रा. अनगडनगर, शेगाव) असे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मे 2019 मध्ये शहरात एका कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्यात एका कंपनीच्या स्टॉलवर आलेख वॉटर स्वाप्टनर नावाची मशीन ठेवली होती. ती मशीन त्याचवेळी जुनघरे यांना पसंत पडल्यामुळे विकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी अजयकुमार गवई याच्याकडे ऑर्डर बुक केली. मशीनशी आवश्‍यक असलेली 1 लाख आठ हजार रुपये रक्कम ऑनलाइन बॅंकिग व्यवस्थेतून गवईला पाठविली. परंतु पाच महिने लोटल्यानंतरही "वॉटर स्वाप्टनर' नावाची खारे पाणी गोड करण्याची मशीन जुनघरे यांना मिळाली नाही. विश्‍वास संपादन करून आपली फसवणूक केली, असा आरोप त्यांनी गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. पोलिसांनी गवईविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angtal was tempted by the saltwater converted into sweet water machine