कार्यालयासमोर बांधली जातात जनावरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सालेकसा (गोंदिया) : तालुक्‍यातील कावराबांध येथील मंडळ अधिकारी कार्यालय वाऱ्यावर असून, वर्षभरापासून मंडळ अधिकारी कार्यालयात येत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात-बारासह अन्य प्रमाणपत्रांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारीच नाही. कोणाचा वचक नाही. सतत कार्यालय बंद राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यालयासमोर जनावरे बांधणे सुरू केले आहे. यावरून शासन, प्रशासनाचे आपल्याच अधिनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटले आहे. हे स्पष्ट होते.  

सालेकसा तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागाचे चार मंडळ आहेत. कावराबांध हे गाव मंडळ महसूल विभाग म्हणून नेमले आहे. या कार्यालयातून शेतकऱ्यांना आनलाइन सात-बारा, नकाशा, फेरफार व इतर प्रमाणपत्रे दिली जातात. मंडळ अधिकारी म्हणून एम. बी. रघुवंशी आहेत. मात्र, ते वर्षभरापासून कार्यालयात येत नसल्याचे समजते. अधिकाऱ्यांचे फलकदेखील गायब झाले आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी कोण? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
या महसूल विभागांतर्गत दहा ते बारा तलाठी साझे येतात. जवळपास 20 ते 30 गावांचा यात समावेश आहे. असे असताना मंडळ अधिकारी कार्यालय वाऱ्यावर असल्याने शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांसाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो. कावराबांध परिसरात पावसाळ्यात अवैध वाळूसाठा जमा करून अधिक भावाने विकला जात आहे. अधिकाऱ्याचा वचक नसल्याचा गैरफायदा वाळूमाफिया घेत आहेत. या परिसरात अवैधरीत्या वीटभट्टीचा व्यवसायदेखील फोफावला आहे. आतापर्यंत एकाही ट्रॅक्‍टर चालक-मालकांवर कारवाई करण्यात आली नाही. यावरून या कार्यालयाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. दरम्यान, कार्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animals are built in front of the office