

Yavatmal
esakal
पुसद (जि. यवतमाळ): मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे यांच्यावर पुसद शहरात प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (ता.२९) सुमारे २० ते ३० जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.