
मंगरूळपीर: शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि बूट वितरित करण्याची घोषणा केली होती. मात्र, वाशीम जिल्ह्यात शाळा सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी अनेक विद्यार्थ्यांना अजूनही ना गणवेश मिळाला, ना बूट. त्यामुळे पालकांत आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.