esakal | Maharashtra Budget 2021 : नागपुरात प्रशासकीय इमारतीला २५० कोटी, गोसेखुर्दला १ हजार कोटी; वाचा अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले?

बोलून बातमी शोधा

announcement for vidarbha in maharashtra budget 2021

आज राज्याचा अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे. यामध्ये अर्थमंत्र्यांनी विदर्भाच्या पारड्यात काय काय टाकले ते दृष्टीक्षेपात...

Maharashtra Budget 2021 : नागपुरात प्रशासकीय इमारतीला २५० कोटी, गोसेखुर्दला १ हजार कोटी; वाचा अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२१ मधील अर्थसंकल्प सादर केला असून हा ठाकरे सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यामध्ये विदर्भासाठी  देखील काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. आजच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी काय घोषणा करण्यात आल्या ते पाहुयात...

हेही वाचा - दोन लाख विद्यार्थिनींचा ‘उपस्थिती भत्ता’ बंद; शिक्षण संचालकांनी काढला अजब आदेश

 • अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून त्यामुळे अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  
 • वर्धा, नागपूर, रामटेक नरखेडला ब्रॉड गेजद्वारे जोडण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याबाबतच आजच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. 
 • गडचिरोलीतील मोहफूल अन् आमचूर योजनेला मंजुरी देण्यात आली. 
 • माडिया गोंड आदिवासी समाजासाठी एकात्मिक विकास वसाहत स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ९७३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 • अमरावती बेलोरा विमानतळाचा विकास करणार.
 • अमरावतीमधील मोर्शी भागात संत्रा प्रकल्प उभारणार.
 • गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असून डिसेंबर २३ अखेर पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
 • नागपूरच्या गोरेवाड्यात जंगल सफारी, विदेश पर्यटकांसाठी गोंडवाना थीम पार्क सुरू.
 • अमरावतीतील मोझरी, कौंडण्यपूर मुलभूत सुविधांसाठी निधी.
 • नागपुरात भव्य प्रशासकीय इमारत बांधणार असून त्यासाठी अंदाजपत्रके, कागदपत्रे तयार करण्याचं काम सुरू आहे. यासाठी २५० कोटी रुपयांचा खर्च असून हे बांधकाम लवकरच सुरू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 
 • पूर्व विदर्भात २०२० मध्ये आलेल्या महापुरामधील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी ५ हजार १२२४ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत