झाम बिल्डर्सविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : सदनिका विक्रीसाठी लोकांकडून पैसे स्वीकारून सदनिका न देणाऱ्या झाम बिल्डर्सविरुद्ध पुन्हा एक बेलतरोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सिकंद झाम (30) व मुकेश हंसराज झाम (43, रा. राजाबाक्षा, मेडिकल चौक) यांनी बेसा परिसरात पहन 38, खसरा क्रमांक 6/2 आणि 7/2च्या भूखंडांवर कन्हय्या हाईट्‌स नावाची सदनिका योजना बांधण्याचे आमिष लोकांना दाखवले. त्यासाठी माहितीपुस्तिकाही प्रसिद्ध केली. इमारतीमध्ये एक गाळे विकण्याचा करार धर्मराव सुखाजी मून (68, रा. जीवन विहार कॉलनी, रघुजीनगर) यांच्याशी केला. 

एकूण कराराच्या 22 लाख 21 हजारांपैकी त्यांनी 19 लाख 74 हजार 700 रुपये धनादेशाद्वारे दिले. परंतु, आरोपींनी तेच गाळे विश्‍वशांती नागरिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना विकले. तसेच त्याच इमारतीमध्ये मून यांना एक सदनिका विकली होती. या सदनिकेचेही बांधकाम पूर्ण करून दिले नाही. अशाप्रकारे अनेकांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another fraud offense against the Zam Builders