खासदार नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी, तत्कालीन खासदारासोबत आहे हा वाद...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

सुनावणीला श्रीमती राणा आणि माजी खासदार आनंद अडसूळ यांनी हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. विद्यमान खासदार नवनीत राणा या आपल्या वकिलांसह आज (ता. 27) सुनावणीसाठी हजर होत्या. आनंद अडसूळ किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीच सुनावणीसाठी हजर नव्हते, असे खासदार राणा यांचे वकील परवेझ खान यांनी सांगितले. त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील परिक्षित गणोरकर न्यायालयीन सुनावणीदरम्यान उपस्थित होते.

अमरावती : 2014 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन खासदार आनंद अडसूळ व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यातील वादाचे प्रकरण पोलिसात पोहोचले होते. त्यासंदर्भात नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिकेवर गुरुवारी (ता. 27) जिल्हासत्र न्यायाधीश (क्र. 1) एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

सुनावणीला श्रीमती राणा आणि माजी खासदार आनंद अडसूळ यांनी हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. विद्यमान खासदार नवनीत राणा या आपल्या वकिलांसह आज (ता. 27) सुनावणीसाठी हजर होत्या. आनंद अडसूळ किंवा त्यांचे वकील यापैकी कुणीच सुनावणीसाठी हजर नव्हते, असे खासदार राणा यांचे वकील परवेझ खान यांनी सांगितले. त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील परिक्षित गणोरकर न्यायालयीन सुनावणीदरम्यान उपस्थित होते.

या कारणामुळे डॅडीला पॅरोल मंजूर...

याचिकेवर 12 मार्चला सुनावणी 
2 एप्रिल 2014 रोजी गाडगेनगर परिसरात एका दूरचित्रवाणी वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान दोन प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. त्याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात अडसूळ व त्यांच्या काही समर्थकांविरुद्ध ऍट्रासिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. गाडगेनगर पोलिसांनी त्याप्रकरणात न्यायालयात बी फायनल पाठविले होते. परंतु त्याविरुद्ध नवनीत राणा यांनी पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली. त्यावर 12 मार्च 2020 रोजी पुढील सुनावणी होईल, असे ऍड. परवेझ खान यांनी सांगितले. नवनीत राणा यांच्या वतीने ऍड. दीप मिश्रा यांनी बाजू मांडली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anravati member of parliament navneet rana present in court