नागपूर : पीपीटीवरून सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत माहिती देताना अनुज धर.
नागपूर : पीपीटीवरून सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत माहिती देताना अनुज धर.

अनुज धर म्हणतात, नेताजींच्या अस्थींची डीएनए चाचणी व्हावी

नागपूर  : नेताजी सुभाषचंद्र बोस बेपत्ता होण्याबाबतची, तसेच त्यांच्या मृत्यूबाबतची कागदपत्रे नष्ट करण्यात आली. मुळात त्यांच्या मृत्यूचा तपास कॉंग्रेसच्या काळात कधीच झालेला नाही. जापानमध्ये असलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी केंद्र सरकार सातत्याने टाळत आहे. ही चाचणी केल्यास अनेक गोष्टी प्रकाशात येतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार अनुज धर यांनी व्यक्‍त केली.
चिटणवीस सेंटर येथे मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत अनुज धर बोलत होते. 1945 सालापासून चर्चेत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यूप्रकरणाची, दस्तऐवज व शक्‍यतांची माहिती धर यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे हे संशोधन करतेवेळी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये सत्तर हजार फाइल्स उपलब्ध असून, यातील माहिती उघड झाल्यास देशात तणावस्थिती निर्माण होऊ शकते, अशी माहिती एका शासकीय अधिकाऱ्याने धर यांना दिली होती. याचाही खुलास त्यांनी केला. 1997 साली न्यायमूर्ती मुखर्जी चौकशी आयोगापासून ते खोसला आयोगापर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत काय संशोधन झाले, याबाबत धर यांनी माहिती दिली.
विमान दुर्घटनेचे कारण देत नेताजी तत्कालीन सोव्हिएट संघात पळून गेले होते, असेही काही अहवालांमध्ये नमूद आहे. मात्र, मी या विचारांशी सहमत नाही, परंतु इशरत जहॉं प्रकरणात गायब झालेल्या फायलींबाबत तपास करणाऱ्या कॉंग्रेस सरकारने ऐतिहासिक महत्त्व असलेले दस्तावेज कशाप्रकारे नष्ट केले गेले, याबाबत माहिती घेणे गरजेचे असल्याचे धर म्हणाले.
कुटुंबीयांची हेरगिरी?
पंडित नेहरू सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची हेरगिरी केल्याचे आयबीच्या दोन फाइल्सवरून उघड झाले. या फाइल्स नॅशनल अर्काइव्हजमध्ये असल्याचे इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. 1948 ते 1968 पर्यंत बोस कुटुंबीयांवर सतत गुप्तचरांची नजर होती. या 20 वर्षांपैकी 16 वर्षे पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि आयबी थेट त्यांना रिपोर्ट देत होती, असेही या बातमीत सांगण्यात आल्याचे धर म्हणाले. संचालन अंकिता देशकर यांनी केले. आभार रसिका जोशी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com