अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव मतदारयादीत

सुनील पतरंगे
रविवार, 9 डिसेंबर 2018

भद्रावती (चंद्रपूर) : बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध नटी अनुष्का शर्मा हिचे नाव भद्रावती शहरातील आयुध निर्माणीच्या प्रभागात आहे. हे वाचून आश्‍चर्य वाटत असले तरी ते खरे आहे. निर्माणीत कर्नल पदावर रुजू झाल्यानंतर तिच्या आईवडिलांचे वास्तव्य निर्माणी वसाहतीतील एका बंगल्यात होते. त्यामुळे त्या काळात शर्मा कुटुंबीयांचे नाव मतदारयादीत समाविष्ट झाले.

अनुष्का शर्मा या प्रसिद्ध नटीचे वडील हे कर्नल होते. चार वर्षांच्या आधीच्या काळात त्यांनी आयुध निर्माणीच्या सुरक्षा व्यवस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. निर्माणी वसाहतीतील सेक्‍टर पाट येथील इमारत क्रमांक 4 "अ' येथे त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य होते. अनुष्काची आई आशीमा शर्मा आणि तिचे वडील येथे राहायचे. आपल्या बिझी शेड्यूलमुळे अनुष्काला भद्रावती येथे भेट देता आली नाही तरी अनेकांना अनुष्का ही येथील कर्नल अजय शर्मा यांची मुलगी असल्याचे माहित होते. मतदारयादीत अनुष्काच्या नावापुढे आई आशीमा शर्मा यांचे नाव आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या 2019 च्या प्रारूप मतदारयादीत 75- वरोरा विधानसभा मतदारसंघातील संरक्षण प्रकल्पामधील यादी क्रमांक 256 वर मतदार क्रमांक 812 वर अनुष्का शर्माचे नाव आहे. निर्माणीतील अनेक मतदार परिवार सोडून गेले. शासनाकडून योग्य सर्वेक्षण करून मतदारयादी अद्ययावत न केल्याने अनेकांची नावे यादीत आहेत. त्यात अनुष्का शर्मा हिचे नाव आहे. हेच नाव भद्रावतीकरांसाठी अभिमानास्पद झाले आहे. आगामी निवडणुकीत एखाद्या कल्पक उमेदवाराने अनुष्काला भद्रावतीत पाचारण केल्यास त्याचा एक मत जास्त मिळण्याची हमी मिळण्यास हरकत नाही.

Web Title: anushka sharma's name in chandrapur voter list