Vidarbha Heat : एप्रिल ठरला सर्वात उष्ण महिना; कमाल तापमान पंचेचाळीशीपार, जगभर विदर्भाची चर्चा
Global Weather Attention : एप्रिल महिना यावर्षी सर्वात उष्ण ठरला आहे, आणि विदर्भातील तापमान पंचेचाळीशी डिग्री पार गेले. हवामानतज्ज्ञांनी मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवली आहे.
नागपूर : भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा भीषण तापदायक राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे. विदर्भात मार्चपाठोपाठ एप्रिलमध्येही उन्हाचे जोरदार चटके जाणवले.