esakal | भाजीतून तर नाही ना येत कोरोना; त्यांना वाटतेय धास्ती
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भद्रावती शहरात प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुदैवाने शहरात अद्याप कोरोना विषाणूंचा शिरकाव झालेला नाही. मात्र, या कडेकोट बंदोबस्तातही अनेक "लूप होल्स' पुढे आले आहेत. भाजीपाल्याची आवक करणारी वाहने त्यापैकीच एक आहेत.

भाजीतून तर नाही ना येत कोरोना; त्यांना वाटतेय धास्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि. चंद्रपूर) : भद्रावती शहरातील भाजीबाजारात  दुसऱ्या जिल्ह्यातून भाजीपाला घेऊन वाहने येत आहेत. ही वाहने कोरोनाग्रस्त भागातून येत असल्यामुळे भद्रावती शहरातील नागरिकांना धडकी भरली आहे. सुरक्षेचे कोणतेही नियम त्यांच्याकडून पाळले जात नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर भद्रावती शहरात प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुदैवाने शहरात अद्याप कोरोना विषाणूंचा शिरकाव झालेला नाही. मात्र, या कडेकोट बंदोबस्तातही अनेक "लूप होल्स' पुढे आले आहेत. भाजीपाल्याची आवक करणारी वाहने त्यापैकीच एक आहेत. तालुक्‍यात बऱ्याच प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते. त्याउपरही भाजीपाला व्यावसायिक दुसऱ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक करीत आहेत. कोरोनाग्रस्त भाग असलेल्या यवतमाळ, नागपूर या शहरासोबतच मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील भाजीपाला शहरात येत आहे. भाजीपाला ही अत्यावश्‍यक सेवा आहे. कोरोनाग्रस्त भागातील या गाड्यांमुळे शहरातील नागरिकांना गंभीर धोका होऊ शकतो. या गाड्या शहरात आल्यानंतर या गाड्यांच्या तथा भाजीपाल्याच्या निर्जंतुकीकरणाची कोणत्याही प्रकारची सोय या ठिकाणी नसल्यामुळे हा धोका वाढला आहे. सर्वत्र योग्य असा बंदोबस्त असताना देखील या माध्यमातून कोरोना विषाणूंचा शिरकाव शहरात होऊ शकतो. या गंभीर विषयाची दखल घेत येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांवर कारवाई करावी. येणाऱ्या गाड्यांची स्थानिक प्रशासनाकडे नोंद करून या गाड्या तसेच त्यातील मालाच्या निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. त्यानंतरच भाजीपाला बाजारात आणण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.

सविस्तर वाचा - त्या पाच भावंडांना अखेर मिळाला मायेचा आधार

योग्य निर्णय घेऊ                                                                      अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत भाजीपाला वाहतुकीला सूट आहे. मात्र, धोका ओळखून याबद्दल नगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली जाईल. त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेऊ.
 महेश शितोळे, तहसीलदार, भद्रावती

loading image
go to top