Yavatmal: व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना एक कोटीचा गंडा; आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार; शेतमाल घेऊन केला पोबारा

₹1 Crore Fraud Alleged in Arni Market Committee: आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून उधारीवर शेतमाल घेऊन तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची कथित फसवणूक केल्याचा आरोप आहे
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: शेतकऱ्यांचा शेतमाल उधारीत घेणाऱ्या व्यापाऱ्याने पोबारा केला. यातून १८ ते २० शेतकऱ्यांची तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. १७) आर्णी पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

अशोक किसनराव इंगोले, शंतनू अशोकराव इंगोले आणि प्रणव अशोकराव इंगोले सर्व रा. कोळवण, आर्णी या तिघांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मधुकर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी विनोद पखाले यांच्यासह इतर १७ शेतकऱ्यांनी फसवणुकीबाबत पोलिसांकडे धाव घेतली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com