esakal | ...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत धावत सुटला

बोलून बातमी शोधा

Arni police filed a case against the drunkard Yavatmal crime news

कोर्ट परिसरात जोरजोरात आरडाओरड केल्याप्रकरणी अमोल खडसे (वय ३२) याच्या तक्रारीवरून आर्णी पोलिस ठाण्यात जब्बार शाह गफ्फार शाहविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् पंचेचाळीस वर्षीय इसम कोर्ट परिसरातून आरडा-ओरड करीत धावत सुटला
sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : येथील कोर्ट परिसरात बुधवारी (२७ जानेवारी) दारूडा दुपारी एक वाजताच्या सुमारास जोरजोरात आरडा-ओरड करीत होता. याची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आर्णी कोर्ट परिसरात एक युवक जोरजोरात आरडा-ओरड करीत असल्याचा आवाज आला. यामुळे सगळेजण एकमेकांकडे बघत होते. कर्तव्यावर असलेल्या व्यक्तीने बाहेर जाऊन बघितले असता एक इसम ओरडताना दिसला. त्याला हटकून जवळ जात नाव गाव विचारले असता तोंडातून उग्र व आंबट वास येत होता.

यानंतर त्याने आपले नाव जब्बार शाह गफ्फार शाह (वय ४५, रा. महालक्ष्मीनगर, आर्णी) असे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय आर्णी यांनी हा इसम दारू पिल्या असल्याचा अभिप्राय दिला.

अधिक माहितीसाठी - गुप्तधन, तिलिस्मी औषध शोधण्यासाठी शेतात जमले नागरिक; सोबत होता हा दुर्मिळ प्राणी

कोर्ट परिसरात जोरजोरात आरडाओरड केल्याप्रकरणी अमोल खडसे (वय ३२) याच्या तक्रारीवरून आर्णी पोलिस ठाण्यात जब्बार शाह गफ्फार शाहविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा

आर्णी कोर्ट परिसरात दारूच्या नशेत जब्बार शाह गफ्फार शाह यानी जोरजोरात आरडा ओरड केली. दारूची नशा अंगात आल्याने थेट कोर्ट परिसरात आरडा ओरडा केल्याने आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.