Yavatmal Accident: नातवाला वाचविताना आजोबाचा अपघाती मृत्यू
Road Accident in Arni: आर्णी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत नातवाला वाचवताना आजोबांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दाभडी-बोरगाव मार्गावरील या अपघातात दुचाकीस्वारही गंभीर जखमी असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
आर्णी (जि. यवतमाळ) : भरधाव येणाऱ्या दुचाकीपासून नातवाला वाचविण्यासाठी गेलेले आजोबा गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दाभडी-बोरगाव मार्गावर मंगळवारी (ता. १७) रात्री ८ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.