
चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्याला अजित राजगोंड याला जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांच्या शिकारी केल्याचा संशय आहे.