राजुऱ्याच्या कलावंताची विदेशात झेप

file photo
file photo
Updated on

राजुरा (जि. चंद्रपूर) : "आर्टेस्ट मंडाई' या युनाटेड किंगडममधील (युके) कला क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पुरस्काराच्या नवव्या आवृत्तीकरिता निवडण्यात आलेल्या पहिल्या सहा कलावंतांमध्ये प्रथमच एका तरुण भारतीय कलावंताचा समावेश झाला आहे. राजुरा तालुक्‍यातील सास्ती येथील प्रभाकर पाचपुते असे दृश्‍य कलेवर काम करणाऱ्या या तरुण कलावंताचे नाव आहे. 40 हजार डॉलरच्या पुरस्कारावर मोहर उमटवेल, असा विश्‍वास प्रभाकर पाचपुते यांनी व्यक्‍त केला आहे.
हा पुरस्कार कल्पनेच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या व आपल्या कलेतून ते मांडणाऱ्या कलावंतांना दिला जातो. यासाठी जगभरातून नामनिर्देशन करता येऊ शकते. प्रभाकर पाचपुते यांनी कलेच्या माध्यमातून कोळसा खाण व परिसरातील समस्यांचे प्रतिबिंब प्रदर्शनातून दाखविले होते. प्रभाकर पाचपुते यांनी कलेच्या माध्यमातून शेतकरी, मजूर, खाण कामगारांचे प्रश्‍न मांडले. 2011-12 मध्ये मुंबईत झालेल्या प्रदर्शनात त्यांनी भिंतीवर चित्र काढून ते व्हिडिओतून प्रतिबिंबित केले. यानंतर त्यांना विदेशातून बोलाविणे आले.
युकेमधील वेल्थ कार्तिक शहरात प्रथम प्रदर्शन झाले. त्यात 60 देशांतील 500 कलावंत सहभागी झाले होते. यातील सहा कलावंतांची निवड करण्यात आली. यात प्रभाकर पाचपुते हे एकमेव भारतीय कलावंत आहे. प्रभाकर यांनी आजपर्यंत आपल्या दृष्य कलेच्या माध्यमातून कधी चित्रकला, मूर्तीकला, व्हिडिओ, पेंटिंगच्या माध्यमातून कोळसा खाणीतील प्रश्‍न, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, कामगारांचे प्रश्‍न व्यक्‍त केले आहे.
काळ्या मातीशी व कोळसा खाणीशी लहानपणापासून नाळ जुळलेल्या प्रभाकरला येथील समस्यांचे सखोल ज्ञान असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून प्रश्‍न समोर आणले. याची दखल जगभरातील चित्रकलावंतांचे प्रदर्शन भरविणाऱ्या संचालक, कला समिक्षक यांनी घेत त्यांची निवड केली आहे. निवडण्यात आलेल्या सहा कलावंतांच्या कलांचे नॅशनल म्युझिअम कार्टीफ येथे ऑक्‍टोबर 2020 मध्ये प्रदर्शन भरविले जाईल. त्यानंतर 2022 मध्ये विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com