आर्वी अवैध गर्भपात प्रकरण कदम दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

शासकीय रुग्णालयातील औषधांच्या अवैध साठा प्रकरणी अटक
Arvi illegal abortion case Kadam married couple police custody
Arvi illegal abortion case Kadam married couple police custody sakal

आर्वी : अल्पवयीन बालिकेच्या अवैध गर्भपात प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. रेखा व डॉ. नीरज कदम या दाम्पत्याला पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वारंटवर ताब्यात घेत आज बुधवारी (ता. नऊ) अटक केली. कदम हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या शासकीय औषधी प्रकरणी सखोल चौकशी करण्याकरिता त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

डॉ. रेखा कदम हिने अवघ्या ३० हजार रुपयांच्या हव्यासापोटी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शाळकरी मुलीचा गर्भपात केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळोंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनोने, पोलिस उपनिरीक्षक जोत्स्ना गिरी यांनी १५ जानेवारीला पोलिस ताफ्यासह कदम हॉस्पिटलची झाडाझडती घेतली. तब्बल १५ तास चाललेल्या या झाडाझडतीमध्ये पोलिसांना काळवीटाच्या कातड्यासह शासकीय रुग्णालयाच्या वापराकरिता असलेल्या ९० पिटोसिन इंजेक्शन व ७१ हजार ७७२ माला एन गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा मिळून आला. हा सर्व साठा जप्त करण्यात आला.

या झाडाझडतीच्या अगोदरच डॉ. रेखा व डॉ. नीरज कदम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती आणि अटकेअभावी शासकीय औषधी सापडल्याचा तपास थंड्याबस्त्यात पडला होता. तपास अधिकारी येथील उपविभागीय अधिकारी सुनील साळोंके यांनी या प्रकरणी मंगळवारी (ता.आठ) न्यायालयाकडे अर्ज दाखल करून पुढील तपासाकरिता डॉ. रेखा व डॉ. नीरज कदम यांची प्राटेक्शन वारंटवर मागणी केली. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केल्यानंतर बुधवारी (ता.नऊ) पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले व दुपारी १२ वाजताचे सुमारास अटक केली आहे.

पोलिस कोठडी मागणार

डॉ. रेखा व निरज कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता.१०) वर्धा येथील विशेष सत्र न्यायाधीश यांच्यापुढे हजर करणार असून पुढील तपासाकरिता पोलिस कोठडीची मागणी करणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळोंके यांनी दिली.

शासकीय औषधींचे गूढ

शासकीय रुग्णालयातील वापराकरिता दिलेले पिटोशीन इंजेक्शन व माला-एन गोळ्यांचा साठा कदम हॉस्पिटलमध्ये कुठून आल्या, याचे गूढ आता चौकशीतून उकलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे डॉ. निरज कदम हे येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील चार वर्षांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. मात्र, येथील औषधसाठा पुस्तिकेचा ताळमेळ जुळत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिली. वर्धा जिल्हा आरोग्य विभागाचे शल्यचिकित्सकांनी सुद्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधून औषधी गेल्या नसल्याचे ठामपणे सांगितल्याने कदम हॉस्पिटलमधल्या शासकीय औषधाचे गूढ कायम आहे.

तीन दिवसांनंतर तक्रार दाखल

कदम हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या शासकीय औषधांची माहिती येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांना १५ जानेवारीलाच दिली होती. शिवाय औषधीसुद्धा त्यांच्या ताब्यात दिल्या होत्या. मुद्देमाल मिळाल्यानंतर व शासकीय औषधी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सुध्दा डॉ. सुटे यांनी तीन दिवस उशिरा १८ जानेवारीला तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com