

Maternal Health Crisis in Remote Areas After Asha Kiranga Death
esakal
एटापल्ली (जि. गडचिरोली): एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील गर्भवती माता आशा संतोष किरंगा व तिच्या पोटातील चिमुकल्याचा मृत्यू समाजमन सुन्न करणारा आहे. यात जिल्हा परीषद प्रशासन व आरोग्य विभागाने आशा किरंगा ही पुजाऱ्याकडे गेल्याने विलंब होऊन तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा केला. पण सरकार रुग्णालयात प्रसूती व्हावी, दुर्गम, अतिदुर्गम भागांतील गर्भवती मातांच्या सुरक्षेसाठी ज्या योजना राबवते, जनजागृतीसाठी जो पैसा खर्च करते त्याचा काहीच उपयोग होत नाही का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.