
बेला : जवळच्या बरबडी येथील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमात हिंगणघाटच्या सेवा मंडळाचे वतीने आषाढी एकादशीनिमित्त हिंगणघाट येथून आज ३ जुलैपासून दिंडी, पालखी, भजन व वारकऱ्यांसह भक्तांची पायदळवारी येत आहे. पायदळवारीत सेवाश्रमचे संस्थापक ब्रम्हमूर्ती शेषानंद पांडे महाराज (भद्रावती) प्रामुख्याने उपस्थित राहतील. परिसरातील भाविकांनी सहभागी होऊन पायदळ वारीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाश्रमचे अध्यक्ष ओमप्रकाश पांडे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.