बुलडाणा : पंढरपूरसाठी खामगाव आगारातून ३४ बसफेऱ्या

३२ फेऱ्या राहणार मुक्‍कामी : दोन वर्षानंतर प्रवाशांची सोय
Ashadhi wari 34 buses from Khamgaon depot to Pandharpur
Ashadhi wari 34 buses from Khamgaon depot to Pandharpursakal

खामगाव : आयुष्यात एकदातरी घडावी पंढरीची वारी, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या विठ्ठल भक्तांना पंढरीची वारी घडवण्यासाठी एस.टी. महामंडळ सज्ज झाले आहे. १ ते १७ जुलै दरम्यान जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी तब्बल २०१ बसेस पंढरपूरची वाट पकडणार आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात १५२ बसेस मुक्कामी राहणार आहे. यामध्ये खामगाव येथून ३४ बसफेऱ्या असून, त्‍यापैकी ३२ मुक्‍कामी आहेत.

गत दोनवर्षापासून कोरोनाचे सावट असल्‍याने खबदारीच्‍या उपाययोजना म्‍हणून गर्दी जमण्यास पायबंद घालण्यात आले होते. परंतु, यंदा वारकरी पायदळ वारीने निघाले आहेत. काही वारकरी व भक्तमंडळी एस. टी. च्या बसने जाण्याची तयारी करत आहे. या वारकरी भक्तांना पंढरी घेऊन जाण्यासाठी एस टी महामंडळाकडून जिह्यात २०१ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसमधून जवळपास बारा हजारांहून अधिक विठ्ठल भक्त प्रवास करत त्यांना लागलेली भेटीची आस या माध्यमातून पुर्ण करणार आहे. तर या व्यतिरिक्त अन्य वाहन व बसमधून भक्तमंडळी आपल्या सोयीनुसार प्रवास करणार आहेत. तर शेगाव पंढरपुर रेल्वेने प्रवास करणारे भक्तंडळीही राहणार आहे. या रेल्वेच्या फेऱ्याही आता वारीच्या नियोजनात आहे.

वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला जगभरातून भाविक भक्त विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होतात. तेव्हा खामगाव आगाराच्‍या वतीने देखिल बसचे नियोजन करण्यात आले आहे. तर १ ते १७ जुलै दरम्यान जिल्ह्यातील सात आगारातून २०१ बसेस भक्तांना घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून आषाढी एकादशीची वारी झालीच नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळाचे नियोजन विस्कळीत होऊन दोन वर्षाचे कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न बुडाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com