
पारशिवनी : नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली. शनिवारी मतमोजणीत आमदार आशिष जयस्वाल यांना मतदारांनी मतदानाच्या रुपात आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा रामटेक विधानसभा क्षेत्रात आमदारांच्या रुपात निवडून दिले. आमदार आशिष जयस्वाल यांच्या विजयात ‘लाडक्या बहिणीं’ची साथ मिळाल्याने आशिष जयस्वाल मताधिक्याने निवडूण आले.