
चंद्रपूर-राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांची चंद्रपूर जिल्हयाच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्हयातील भाजप नेत्यांमध्ये त्यांच्या जवळ जाण्याची स्पर्धा सुरु होईल. जिल्ह्यात भाजप अंतर्गत प्रचंड दुफळी आहे. पाच आमदार आहे.मात्र दोन विरुद्ध तीन असा अंतर्गत वाद या आमदारांमध्ये बघायला मिळतो. त्यातही जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि नवे पालकमंत्री उईके यांच्यातील संबंध पुढील काळात कसे राहील, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.