

Gadchiroli News
esakal
चामोर्शी: आष्टी पेपर मिल कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी चामोर्शी पंचायत समितीच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी व मिल प्रशासनासोबत झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपली ठाम भूमिका मांडली. जर कंपनीला उद्योग चालवणे शक्य नसेल, तर मूळ करारानुसार आमच्या जमिनी आम्हाला परत करा. या जमिनी परत मिळवण्यासाठी करारातील अटीनुसार ठराविक रक्कम भरण्यासही आम्ही तयार आहोत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.