Maharashtra vidhansabha 2019 : अश्‍विन मुद्‌गल म्हणाले, राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर :  नागपूर जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आहवान जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुद्‌गल यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवन सभागृह येथे सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.

राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा, कामाची वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्‍यक ती परवानगी घ्यावी. प्रस्तावित सभेच्या जागी कोणाचेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करावे. पक्षाची मिरवणूक काढतानाही वाहतुकीचे नियम पाळावे. मिरवणुकीमुळे अडथळा होऊ देऊ नये. सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहितीच्या आधारावर टीकाटिपणी करू नये. लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब करू नये. मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नये. निवडणुकीच्या काळात मद्यवाटप केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwin Mudgal said, political parties should adhere to the code of conduct