पहाटेच्या वेळी सुरू होती कॅन्टीनची लगबग, मागून आला आरोपी आणि...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

पहाटेच्या वेळी चहा विक्रीतून बऱ्यापैकी कमाई होत असल्याने चहा तयार करण्याची त्याची लगबग सुरू होती. दरम्यान शरीफ लाला मागून आला काही कळायच्या आत त्याने बशीरोद्दीनच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने घाव केला. काही कळायच्या आत आरोपीने तेथून पळ काढला. डोक्‍यातून रक्‍ताची धार वहायला लागली, जवळपास कुणीही नसल्याने रक्तबंबाळ अवस्थेतच बशीरोद्दीन याने भाऊ जैनोद्दीन नवाब यांच्या घराकडे धाव घेतली व शरीफ लाला याने आपल्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा घाव घातल्याचे सांगितले.

महागाव (जि. यवतमाळ) : डोक्‍यात कुऱ्हाडीचा वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना फुलसावंगी येथे बुधवारी (ता. 17) रोजी घडली. बशीरोद्दीन इमामोद्दीन नवाब (वय 45) असे जखमीचे नाव असून, तो फुलसावंगी येथे चहा कॅन्टीन चालवतो. पहाटे पाच वाजताच्या सुमारास बशीरोद्दीन नवाब याच्यावर फुलसावंगी येथील शरीफ लाला उर्फ जुम्माखान पठाण याने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला चढविला.

गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने बशीरोद्दीन यांचे कॅन्टीन बंदच होते. परंतु एक जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने त्याने आपला व्यवसाय सुरू केला. पहाटेच्या वेळी चहा विक्रीतून बऱ्यापैकी कमाई होत असल्याने चहा तयार करण्याची त्याची लगबग सुरू होती. दरम्यान शरीफ लाला मागून आला काही कळायच्या आत त्याने बशीरोद्दीनच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने घाव केला. काही कळायच्या आत आरोपीने तेथून पळ काढला. डोक्‍यातून रक्‍ताची धार वहायला लागली, जवळपास कुणीही नसल्याने रक्तबंबाळ अवस्थेतच बशीरोद्दीन याने भाऊ जैनोद्दीन नवाब यांच्या घराकडे धाव घेतली व शरीफ लाला याने आपल्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा घाव घातल्याचे सांगितले.

क्लिक करा - अमरावतीचा अखेर "रेडझोन"मध्ये समावेश, आणखी सात कोरोनाबाधित आढळले

भावाने लगेच बशीरोद्दीन नवाब यांच्यावर फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुसद येथे हलवले. परंतु जखम मोठी असल्याने आणि रक्‍त वाहणे सुरूच असल्याने डॉक्‍टरांनी नागपूर येथे हलविण्यास सांगितले. त्यानंतर त्याला लगेच नागपूर येथे हलविण्यात आले. जखमीचा भाऊ जैनोद्दीन नवाब यांनी याप्रकरणी महागाव पो.स्टे.ला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यामागील कारण मात्र अद्याप कळलेले नसून, पोलिस तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault with an ax at Phulsawangi, Accused arrested