भाजप विमानतळावरच उधळणार विजयाचा गुलाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी सात वाजता नागपूरला येत आहे. तोपर्यंत निकाल जाहीर झालेला असल्याने त्यांना नागपूर विमानतळावरच विजयाचा गुलाल उधळून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी सात वाजता नागपूरला येत आहे. तोपर्यंत निकाल जाहीर झालेला असल्याने त्यांना नागपूर विमानतळावरच विजयाचा गुलाल उधळून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 
मुख्यमंत्र्यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सोमवारी मतदान आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले होते. ते उद्या विमानाने नागपूरला येणार आहेत. त्यांना विमानतळावराच भाजप-सेना युतीच्या विजयाची बातमी देऊन येथेच जल्लोष करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, मिलिंद माने, विकास कुंभारे, मोहन मते, डॉ. उपेंद्र कोठेकर, श्रीकांत देशपांडे, संदीप जोशी, राजू हडप, राजेश बागडी, गुड्डू त्रिवेदी, रमेश भंडारी, किशन गावंडे, संजय ठाकरे, महेंद्र राऊत, बंडू राऊत, दिलीप गौर, शिवानी दाणी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुंबे, चंदन गोस्वामी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assembly election result, counting