
बुलडाणा : येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आचारसंहिता जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय गायकवाड हेच राहतील, हे निश्चित आहे. परंतु प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळते? याकडे संपूर्ण मतदारसंघाच्या नजरा लागलेल्या आहेत.