esakal | शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद

या बैठकीत विश्रामगृहात शिवसैनिकांत राडा झाला.

शिवसेनेच्या दोन गटात राडा! मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा: शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) वर्ध्यात आले असता त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत विश्रामगृहात शिवसैनिकांत राडा झाला. एका गटाकडून शिवसेना संपर्क प्रमुखांशी हातापाई झाल्याचा दावा केला जातो तर दुसर्‍या गटाकडून संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडल नसल्याच म्हणणे आहे.

निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने मास्क(Mask) लावले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याकरिता हटकल्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. (at the shiv sena meeting in wardha, a dispute arose among the workers)

हेही वाचा: रस्ते, पूल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सिताराम भूते मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मास्क न लावल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. त्यावरून दोन गटांत चांगलीच बाचाबाची झाली. शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

हेही वाचा: चंद्रपुरात बाटली उभी; वर्धा जिल्ह्यावर दारूतस्करांची मदार

सीताराम भुते मास्क लावून नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. भुते यांनी चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांना शिवप्रसाद दिला. संपर्क प्रमुखांशी काहीही झाले नाही. हा संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट आहे.

- प्रशांत शहागडकर,जिल्हाप्रमुख

उदय सामंत वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. यावेळी संपर्क प्रमुखांनी जरा वरच्या सुरात संवाद साधला. यामुळे बाचाबाची झाली.

- सीताराम भुते, शिवसेना कार्यकर्ता, हिंगणघाट

loading image