Yavatmal News : एटीएम मशिनमध्ये छेडछाड; एक लाख १४ हजार लंपास
ATM Theft : यवतमाळमधील दोन SBI एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एकूण १.१४ लाख रुपयांची रोकड चोरली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून चौघा अज्ञातांवर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ : शहरातील एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख १४ हजार २०० रुपयांची रोख लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना १६ ते २० मे दरम्यान घडली.